रचनात्मक विचार कसे अमलात आणाल? 2 ते 7 वर्ष च मुलांच्या विकास
*रचनात्मक विचार कसे अमलात आणाल?*
रचनात्मक विचार म्हणजे कोणतेही काम योजना करून, नवीन स्वरूपात व व्यवस्थितरीत्या पूर्ण करण्यासाठी तयारी करणे.
*उदाहरणार्थ:* समजा आपल्या येथे सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली असेल, त्यावेळी ती नेहमीप्रमाणे संपन्न होणार असते; परंतु रचनात्मक विचार करणारे लोक त्यावेळी कथा ऐकणान्यासाठी बसण्याची योग्य आसनव्यवस्था, पिण्यासाठी पाणी, प्रसादासाठी कागदी वाट्या, त्या जागेमध्ये सुगंधी द्रव्याची फवारणी इ. सारख्या नवीन व सुलभ व्यवस्था करण्यासाठी धडपड करतात.
❇️ रचनात्मक विचारप्रणालीमुळे मुलांमध्ये
🔹 शिक्षणासाठी उत्तम विचारप्रणाली तयार होते.
🔹आत्मविश्वास व स्व उच्चप्रतिमा निर्माण होते.
🔹 जीवनातील प्रसंगानुसार स्वतःला बदलण्याची शक्ती निर्माण होते.
❇️ मुलांमध्ये वैचारिक क्षमता निर्माण करण्यासाठी लहानपणापासूनच काही खेळ व खेळणी खेळवावेत.
१. विशिष्ट विषय, त्यातील अर्थपूर्ण जोड शब्दांचा खेळ खेळवणे
आपण मुलांसोबत खेळत असताना मुलांना एक विशिष्ट विषय व त्यातील शब्द द्यावा. मुलाने त्या विषयासंबंधी व त्या शब्दाशी अर्थपूर्ण जोडला जाणारा शब्द सांगावा.
जसे - विषय-फुटबॉल मॅच
वडील- प्लेअर
मूल- ग्राउंड
वडील - गोल
मूल- नेट/बॉल/स्कोअर
*Remember...* मुलाला जोडीचा शब्द सांगण्यासाठी आवश्यक वेळ द्यावा.
२. शब्दकोडे देऊन ते सोडविण्याचा कोड्यांचा खेळ खेळणे मुलांसोबत खेळत असताना शब्दकोडे देऊन सोडविण्याचा खेळ खेळावा. शब्दकोडे सांगताना मुलाला विचार करू देत खेळावे.
जसे एक प्रचंड मोठा प्राणी...
शाकाहारी आहे...
त्याला एक मोठी सोंड असते.
तो जंगलात राहतो...
उत्तर हत्ती
३. संशोधकांनी लावलेल्या शोधाविषयी माहिती द्यावी
मुलांना आपल्यासोबतच्या चर्चेतून विविध संशोधकांबद्दल माहिती द्यावी. त्यांनी स्वतःच्या संकल्पना कशाप्रकारे शोधून काढल्या व जगासमोर मांडल्या याबद्दल विस्तृत चर्चा करावी.
उदाहरणार्थ - न्यूटनला गुरुत्वाकर्षणाबद्दलची संकल्पना कशाप्रकारे मनामध्ये आली व त्याने जगासमोर कसे सिद्ध केले, याप्रकारे माहिती द्यावी.
*Remember....* Knowledge is wisdom
४. एकाच आकाराचा उपयोग करून किती चित्र तयार करता येतात, असे चित्रकलेतील प्रश्न सोडविणे
मुलांकडून चित्रकलेचा सराव करीत असताना एका आकारावरून वेगवेगळी चित्रे तयार करण्याचे प्रश्न सोडवावेत. एकाच आकाराचा उपयोग करून किती चित्र तयार करता येतात, याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करता येते.
जसे - एक गोल वर्तुळाचे विविध चित्र काढण्यास प्रवृत्त करावे.
उत्तर- चेहरा, चंद्र, सूर्य, घड्याळ इ. वरील सरावासोबत विविध आकार एकत्र जोडून चित्र तयार करण्याचा सराव करावा.
"Imagination is more important than knowledge" "मुलांमध्ये कल्पकता जोपासा, ज्ञानापेक्षा कल्पकता जास्त महत्त्वाची असते.".
Dr Ashish Agrawal, Paediatrician and expert in child behavior, education and developsmental problems.
Ph: 8888126037, 8483905330, 7057551985
Join us ......
🔹 Facebook : Positive parenting
🔹 Youtube : Dr Ashish Agrawal
Comments
Post a Comment