Child request to parents (In Marathi)
विनंती आपल्या बाळाची
-------------------------------
(Child Requesting us..)
आई-बाबा तुम्हाला काही सांगायचं, थोडं सांगू का?
थोडा वेळ मला देऊन, विनंती माझी ऐकाल का?
नुसतेच चॉकलेट, कुरकुरे, खेळणी नको आहेत मला थोडा वेळ द्याल का गप्पा तुमच्याशी मारायच्यात मला!
आई-बाबा माझ्यासमोर तुम्ही भांडू नका ना....
भीती वाटते मला तुमच्यापासून मी दूर जाईल ना!
बाबा T.V. पहाण्यासाठी तुम्ही मला का रागवता ?
स्वतः मात्र T.V. साठी रात्र खराब करता !
आई-बाबा मला शिक्षेची भीती दाखवू नका ना....
त्यापेक्षा शिस्तीचं महत्व मला समजावून सांगा ना !
अपेक्षांचे ओझे लादू नका. कुवत माझी ओळखा....
अपयशी जरी झालो कधी, प्रेमाने यशाचा मार्ग दाखवा !
माझी कामे मलाच करु द्या, आज चुकेल पण उद्या शिकेल....
तुम्ही जर का ती केलीत तर सांगा मी स्वावलंबी कसा बनेल !
स्तुती करतात माझी काका-काकू, मामा-मामी....
तुम्ही नुसतेच संगीत, स्तुती तुमचीच येईल कामी !
अभ्यासासोबत माझ्या भावनीक विकासाकडे लक्ष द्या....
*वरील कवितेतील आपल्या बाळाची विनंती वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की बाळ किती नम्रपणे आपल्या अपेक्षा सांगत आहे.* आपल्या पालकत्वातील उणीवा त्याने किती नम्रपणे आपल्यासमोर मांडून मनातील सर्व खंत काही ओळींमध्ये स्पष्ट केली आहे. आपल्याला माहित आहे की संस्कार घडविण्यासाठी लहान वय सर्वश्रेष्ठ आहे कारण या वयात घातलेले संस्कार आयुष्यभर जशेच्या तशे कार्यरत राहतात. या लहान वयामध्ये पडलेल्या चांगल्या किंवा चुकीचे सवयी मोठेपणी सहजासहज बदलत नाहीत. या वयामध्येच संस्कार करणे का गरजेचे आहे? असे कोणी विचारले तर याचे कारण असे की याच वयामध्ये मेंदुची वाढ अतिशय वेगात व पूर्ण होत असते. मेंदुच्या वाढीसोबतच मुल सर्व गोष्टींचे आकलन व आत्मसात करणे करीत असते. यावेळी ज्या गोष्टी ज्या स्वरुपात त्याने आत्मसात केल्या त्याचप्रमाणे नेहमीसाठी टिकून राहतात. आपण पालक या नात्याने त्यांच्या बौद्धिक विकासामध्ये चांगल्या संस्काराची भर घातली तर चांगल्या विचारांची आवरणे त्याठिकाणी जमा होतील. या आवरणांचा म्हणजेच संस्काराचा फायदा पुढील आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करण्यासाठी आपल्या मुलाला होईल. चांगले संस्कार घडविणे ही कष्टाची व कुंभाराच्या मडके तयार करण्याच्या कलेप्रमाणे कठीण आहे. तरीसुद्धा काही शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास अतिशय सहज व सोपी आहे. असे असतांना देखील मुलाला वरील प्रकारची विनंती करण्याची आज आवश्यकता का पडली?
आपले मुल आपल्याला अशी विनंती का करत असेल याचा जर शांत मनाने विचार केल्यास उत्तर आपल्या जवळ आहे. थोडा भुतकाळापासून विचार करु या. आजपासून शंभर वर्षापूर्वी नादेडहून मुंबईला जाणे ही अतिशय मोठी समस्या होती,तिन-तिन दिवस प्रवास करावा लागायचा. आज आपण एका तासात तेथे जाऊ शकतो. त्या काळात जर कोणी म्हटले की अमेरिकेच्या व्यक्तीशी पाहता-पाहता बोलता येईल तर त्याला कोणीही सहज वेडे ठरवेल व त्याच्या घरचेच लोक त्याच्यावर हसतील. आज आपण अमेरिकेच्या व्यक्तीला आपल्यासमोरील स्क्रीनमध्ये पाहून गप्पा मारु शकतो. म्हणजेच आपला विकासाचा पूर्ण ध्यास बौद्धीक व यांत्रीक विकासाकडे आहे. सर्व पालकांचे ध्येय आपले मुल या विकासामध्ये मागे पडू नये व त्याचा बुध्यांक उच्च रहावा याकडे आहे.
मुल जास्त बुद्धीवंत असावे व सर्वात उच्चस्थानी त्याने बसावे ही ओढ प्रत्येक पालकाची झाली आहे. बुध्यांक वाढविण्याच्या तणावाखाली मुलांच्या भावना विकसीत व्हाव्यात म्हणजेच भावनांक वाढावा याकडे आपलेच नव्हे तर सब जगाचे दुर्लक्ष झालेले आहे.
मागील दशकामध्ये IQ (बुध्यांक) सरासरी ३५% वाढला आहे व EQ (भावनांक ) ५०% ने कमी झाला आहे. याचा परिणाम आपण पाहत आहोत की आत्महत्या, तलाक, लैंगिक अत्याचार, फसवणुकीचे गुन्हे इ.चे प्रमाण खुप वाढले आहे.
वरिल विषयावर विचार केल्यास आपल्याला उत्तर मिळालेच असेल की मुलांच्या व्यक्तीमत्व विकास व भावनांकडे लक्ष देणे फार आवश्यक झाले आहे. आपल्या मुलांचा IQ वाढवतांना EQ वाढवणे व व्यक्तीमत्व विकसीत करणे यासाठी लहान वयापासून योग्य संस्कार करावेत.
आई वडिलांच्या योग्य मेहनतीने व कसोटीने घातलेल्या संस्कारातून अशक्यही शक्य होऊ शकते. या विषयाची भरपूर उदाहरणे उपलब्ध आहे. एका आश्चर्यजनक उदाहरणाचा या ठिकाणी मी उल्लेख केला आहे.
१९४० या इस्वीसनामध्ये जन्मलेल्या विल्मा रुडॉल्फ या मुलीची सत्य घटना आहे. या मुलीचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. तीच्या पायाला काही त्रास होत होता, त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तीला पोलीओ असून ती चालू शकणार नाही असे सांगीतले. पुढे काही दिवस विविध प्रयत्न किंवा विविध डॉक्टरांचे सल्ले त्या मुलीच्या आईने घेतले परंतु सर्वानुमते तिचे चालणे अशक्य होते. आईची इच्छा प्रबळ होती,तीला आपली मुलगी काहीही करून चालताना पहावयाची होती. एका दिवशी त्या आई-वडीलांना एका फिजीओथेरपी सेंटर बद्दल माहिती मिळाली. तेथे उपचार केल्यास कुबड्यांच्या सहाय्याने चालता येऊ शकेल असे सांगण्यात आले होते. हे सेंटर त्यांच्या गावापासून ८० किमी दुर होते. त्याकाळामध्ये तेथे जाण्यासाठी किमान दोन दिवस लागत असतांना अशा ठिकाणी दर महिन्याला जाऊन उपचार घेतले. आईचे स्वप्न काही दिवसात पुर्णत्वाकडे जाऊन वय वर्षे १० मध्ये ती मुलगी विल्मा रूडॉल्फ कुबड्यांच्या आधारावर चालू लागली व १२ व्या वर्षी कोणत्याही सहाय्यतेविणा चालु शकत होती. याच मलीला वयाच्या १४ व्या वर्षी धावता येत होते. पुढे तीने १६ व्या वर्षी ऑलम्पीकमध्ये ब्रांझ पदक व २० व्या वर्षी सुवर्ण पदक मिळविले.
म्हणजेच आई-वडीलांचा प्रबळ विश्वास व योग्य मेहनत अशक्य असे सुध्दा शक्य करू शकते. त्यामुळे पालकांनी सर्व प्रकारे जसे- आपल्या वागण्यातुन, बोलण्यातुन, मार्गदर्शनातुन व घरातील वातावरणातुन योग्य संस्कार बालपणीच रूजवावेत.
🙏🏻🙏🏻🙏🏻 This article is taken from my book "Bal Sanskar."
🔹Writer: Dr Ashish Agrawal
8888126037, 7057551985
🔹 Book: Bal Sanskar
Join us...
🔸 Facebook: Positive parenting
🔸 YouTube: Dr Ashish Agrawal
🔸 Website: drashishagrawal.in
Comments
Post a Comment