आई-वडिलांची भांडणे व मुलांवर होणार परिणाम- कारण व उपाय (पुस्तस्क: बाल संस्कार)
आई-वडिलांची भांडणे
---------------------------
सर्व प्रकारच्या रिसर्च, सर्वेक्षण व अनुभवातुन असे लक्षात आले आहे की मुलांच्या वाईट वर्तणुकीमागे किंवा बेशिस्तपणामध्ये आई वडिलांची भांडणे हे मुख्य कारण आहे.
आई-वडिलांमध्ये भांडणे होणे ही आपल्याकडे अतिशय सामान्य बाब आहे.ज्या घरात भांडणे होत नाहीत त्या घरात कदाचित माणसेच रहात नसतील.
ही जेवढी सामान्य गोष्ट आहे तेवढीच ती मुलांसाठी हानीकारक ठरु शकते.
आपल्याकडे होणारी भांडणे ही मुख्यत्वे करुन स्वतःच्या आत्म सन्मानासाठी किंवा दोघांमधील शैक्षणिक व वैचारिक असंतुलनामुळे असु शकतात. ही भांडणे जेव्हा मुलांसमोर मोठया प्रमाणात किंवा नेहमी होतात तेव्हा सदरील चित्रात दाखविल्याप्रमाणे मुले स्वतःला असुरक्षित समजू लागतात. काही वेळा मुलांना असे देखिल वाटते की आपल्यामुळेच आई-वडीलांची भांडणे होतात व एकेदिवशी एक दुसऱ्यापासून दूर होऊ शकतात, अशी भावना तयार झाल्यामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतात. मुलांवर आई-वडिलांच्या भांडणाचा कशाप्रकारे परिणाम होतो हे समजण्यासाठी पालकांचे त्यांच्या भांडणाच्या पध्दतीनुसार चार प्रकारात वर्गीकरण करता येते.
In short... Don't try to make your child perfect, try to make your relationship with your partner perfect
अ) वर्गीकरण
1) नेहमी जोरजोरात भांडणारे
----------------------------------
अशाप्रकारची नेहमी जोरजोरात भांडणे करणाऱ्या आई-वडीलांचे मुलांवर फार वाईट परिणाम होतात. ते केव्हाही त्यांच्या आई वडीलांना समजू शकत नाहीत व त्यांना घरामध्ये किंवा घराबाहेर @ कुठेही सुरक्षितता जाणवत नाही. अशा पालकांमुळे मुलांचा आत्मविश्वास नाहीसा होतो.
Remember... Parental conflict is slow poison
2) भांडण कमी पण नेहमी टेन्शन
मध्ये असलेले
काही आई-वडील मुलांसमोर फक्त भांडण करू नये हा नियम पाळतात परंतु स्वतः शरीराच्या हालचाली (Body Language), चेहऱ्यावरचे भाव लपवू शकत नाहीत. अशा प्रकारे टेन्शन मध्ये असलेल्या पालकांनाही मुले चांगल्याप्रकारे ओळखतात.
त्यांच्यात वाद विवाद आहेत हे ही समजू शकतात. वरील प्रमाणे मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते व वाईट परिणाम कमी प्रमणात होतात,
3) भांडणे न करणारे
----------------------
अशा प्रकारच्या आई-वडीलांची मुले स्वतःला सुरक्षित समजतात. हे आई-वडील भांडणेच करीत नाहीत त्यामुळे परिणामांचा तर प्रश्नच उद्भवणार नाही. परंतु भांडणे कशी असतात व त्यांना कशाप्रकारे सोडवावे हे मुलांना शिकायलाच मिळत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आई Sc.वडील फक्त चांगले असू शकतात.
4) कधी कधी भांडणारे व लवकर मिटविणारे
----------------------------------------------
हे आई-वडील अतिशय चांगल्या प्रकारात मोडतात कारण मुलांसमोर कधी-कधी भांडतात, स्वतः मिटवून घेतात व लगेच गोड बोलतात. त्यामुळे मुलांना असुरक्षितता जाणवणार नाही तसेच झालेली भांडणे कशी मिटवावीत हे सुद्धा शिकायला मिळेल म्हणून सर्व पालकांनी अशाप्रकारे वागण्याचा अवलंब करावा.
In short... The most important aspect of parenting is to have perfect relationship with your spouse.
ब) सर्वेक्षण
डेली न्युज एजंसी तर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले होते. या मध्ये त्यांनी तुरूगांतील १८ वर्षा खालील गुन्हेगाराचा अभ्यास केला. एकूण ५००० केसेस पैकी असे निदर्शनास आले की बालगुन्हेगारीची प्रवृत्ती असलेल्या ९०% मुलांच्या आई-वडीलांमध्ये बहुतांशी पालक विभक्त झालेले(Divorce), नेहमी भांडणारे, घरातील वातावरण तणावपूर्ण असलेले, मुळतः दोघांपैकी एक गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले किंवा रागीष्ट स्वभावाचे असे होते
In short... If father wish to give something to his children, love their mother
क) मुलांवर होणारे परिणाम
आई-वडिलांची भांडणे मुलांच्या मनावर विषाप्रमाणे कार्य करतात.
भांडणे करणाऱ्या आई-वडिलांना हे माहित नसते की आपण भांडण करताना एका विषाची छोटी मात्रा दररोज आपल्या मुलांना देत असतो. आई-वडिलांच्या भांडणाचे परिणाम मुलांमध्ये खालीलप्रमाणे पहायला मिळतात.
i) बाहेर दिसणारे परिणाम
------------------------------
मुलांमध्ये शांतपणा कमी होऊन राग, क्रुरवृत्ती, बेशीस्तपणा, स्वतःच्या भावनांचर अनियंत्रण इ. गोष्टी पहायला मिळतात.
ii) बाहेर न दिसणारे परिणाम
--------------------------------
बाहेर आपल्याला न दिसणारे परंतु मुलाला स्वतः जानवणारे निराशा, चिंता, लाजाळूपणा, एकाकीपणा, आत्मविश्वासाची कमतरता, सामाजिक कौशल्य कमी असणे, बौध्दीक चातुर्याची कमतरता इ. परिणाम दिसतात.
iii) शारीरीक समस्या
----------------------
डोकेदुखी, पोट दुखणे, प्रतिकार शक्ती कमी असणे, बालदमा, बद्धकोष्ठता, अनियमीत मलविसर्जनाच्या सवयी इ. शारीरीक समस्या मुलांना जाणवतात. तसेच मुलांमध्ये झोप सुध्दा कमी होत असते.
iv) वैचारीक परिणाम
----------------------
मुलांमध्ये सतत तणावामध्ये राहील्यामुळे स्ट्रेस हार्मोन्सचा स्त्राव वाढतो. त्यामुळे त्यांची वैचारीक क्षमता कमी होऊन त्याचा परिणाम स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता नसणे, बौध्दीक क्षमता कमी होणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष होणे इ. पहायला मिळतात.
v) भीतीदायक विचार
----------------------
मुलांमध्ये सतत भांडणे पाहून आपले आई वडिल एकादिवशी वेगळे होऊन आपल्याला कोणातरी एका सोबत रहावे लागेल अशी भीती निर्माण होते.
In short... If Father wish to give something to children love their mother
ड) उपाय
i) स्वतःशी चर्चा
-----------------
आपण जेव्हा भांडणाला सुरवात करतो तेव्हा एकदा फक्त मुलाचा फोटो आपल्या हातामध्ये घ्यावा व त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्याच्यासोबत बोलावे, "मला माहित आहे की मी आता भांडणे केल्यामुळे त्याचा परिणाम तुझ्यावर होणार आहे. त्यामुळे तू भावनीक व बौध्दीकरित्या जखमी होशील आणि त्याचे परिणाम तुला तुझ्या पुढील आयुष्यात भोगावेही लागतील पण काय करू यावेळी तुझ्या यासर्व गोष्टीपेक्षा माझा राग महत्वाचा आहे. आतातरी मी तुझ्याकडे लक्ष देण्याच्या मुड मध्ये नाही तुझे काहीही हो मला काय करायचेय?" असे बोलणे झाल्यावर तो फोटो फेकून भांडणाला सुरुवात करावी.
In short.. If you are not a part of the solution, then you are part of the problem.
ii) अध्यात्मिक वातावरण
----------------------------
घरातील वातावरण आध्यात्मिक स्वरुपाचे म्हणजे धार्मिकता, देवाची पुजा-अर्चना, प्रार्थना आपआपल्या धर्माप्रमाणे करावी.
बासाठी संत श्री आसारामजी बापू किंवा साईबाबा किंवा कोणत्याही धर्मगुरुची पुस्तके, सिडी, व्हिडीओ सिडी चा वापर घरामध्ये नियमित करावा. असे केल्याने बाईट मार्ग, वाईट विचार किंवा भांडणे यासारख्या गोष्टीपासून आपण दूर राहू शकतो.
iii) पुस्तकांचे वाचन
-------------------
विविध प्रकाशनाची पुस्तके बाजारात उपलब्ध असतात. आपल्याच ईश्वर प्रकाशनाची विविध पुस्तके उपलब्ध आहेत यातून मुलांसाठी पालकांनी करावयाच्या व्यवहाराबद्दल व त्यांच्या परिणामा बद्दल स्पष्टीकरणासह दिले आहे. याचे वाचन पालकांनी केल्यास आपल्या मुलांचे उज्वल भविष्य घडविण्यास हातभार लागेल.
iv) पालक मेळावा
-------------------
मुलांच्या मानसिकतेवर, त्यांच्या चांगल्या व बाईट विकासावर प्रकाश टाकणारे पालकांचे मेळावे आमच्याकडून होतात किंवा इतर ठिकाणी होत असतात. त्यामध्ये सकारात्मक रित्या सहभाग घेतल्यास आपल्या मुलांसाठी काय करता येईल हे आपल्याला लक्षात येईल.
v) ध्यान व योगा
-----------------
घरामध्ये सर्व सदस्यानी ध्यान व योगा यासारखे मनाची एकाग्रता वाढणारे उपक्रम केल्यास आपल्या घरातील वातावरण सुधारण्यास व भांडणे कमी होण्यास मदत होईल,
vi) कला
-------
आपल्या घरामध्ये कला, छंद व मनोरंजन यासाठी पुरक वातावरण तयार करावे, यासाठी एखादी कला हस्तगत करुन त्याचा सराव करावा. यामुळे आपल्या मनातील भावना त्यामध्ये उतरवून मन शांत ठेवता येते. उदा.संगीत : मध्ये गिटार, तबला वादन किंवा गायन यासारख्या कला हस्तगत करता येतात.
vi) डॉक्टरांची मुलाखत
------------------------
नेहमी भांडणे होणाऱ्या आई-वडिलांनी आपल्या मुलांवर झालेले परिणाम समजुन घेण्यासाठी व दुर करण्यासाठी डॉक्टरांची मुलाखत घ्यावी. तसेच मुलांसोबत करावयाच्या व्यवहारासंबंधी योग्य मार्गदर्शन बाल मनोविकार तज्ञ (Child Psychologist) या डॉक्टरांकडून घ्यावेत.
आम्ही स्वतः अशाप्रकारचे एक 'ईश्वर कॉन्सेलींग सेंटर' या नावाने लहान मुलांच्या संबंधीत मुलाखात केंद्र चालवतो. यामध्ये सर्व प्रथम आई बडिलांकडून काही प्रश्न सोडवून घेतो. यानंतर आई वडिल व मुल यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन सविस्तर चर्चा करतो. वरील सर्व माहिती व चर्चा यातून खरे कारण शोधल्या जाते. अखेरीस फक्त आई-वडिलां सोबत परत मुलाखतीमध्ये सविस्तरपणे कारणे, परिणाम व त्यावर करता येणारे सर्व उपाय व मार्गदर्शन केले जाते. अशाप्रकारची तीन वेळा एक ते दिड तासाची मुलाखात घेऊन मोठ्या संख्येमध्ये पालकांना उपदेश करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
माझ्या आतापर्यंतच्या बालरोग व बालमाणस शास्त्राच्या १४ वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये असे आढळले आहे की सर्व माणसीक समस्या असणाऱ्या मुलांपैकी एकही मुल असे नव्हते की ज्यांचे आई-वडिल भांडणे करीत नाहीत. अखेरीस असे सांगावे वाटते की आपल्या मुलाला खरे प्रेम व संस्कार द्यावयाचे आहेत तर। आई-वडीलांनी आपसामध्ये खुप प्रेम करावे.
Remember... The wish of all children is that their parents do not fight with each other and workout difficulties in a mature fashion without restoring to hurtful comment and behavior
🙏🏻🙏🏻 If you like this blog, please share with other mothers and friends
Remember..... Gaining knowledge is first step to wisdom and sharing it is first step to humanity
Dr Ashish Agrawal, Paediatrician and expert in child behavior, education and developmental problems.
Ph: 8888126037, 7057551985
Join us......
🔹Facebook: Positive parenting
🔹Youtube: Dr Ashish Agrawal
Comments
Post a Comment